WI vs IND : विंडिज विरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा नाराज ? नेमकं काय झालं वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. विंडीज दौऱ्यात त्या संदर्भातले बदल पाहायला देखील मिळाले. मात्र आता कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयामुळे टीम इंडियात आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
1 / 7
भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून सुरु होत आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. यासाठी भारतीय संघाने जोरदार सराव केला. तीन तासांच्या सराव शिबिरात सर्व खेळाडू दिसले. मात्र कर्णधार रोहित शर्मा याने दांडी मारली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
2 / 7
रोहित शर्मा टीम इंडियाच्या सराव शिबिरात नसल्याची माहिती डॉमिनिकाहून विमल कुमार यांनी यूट्यूब चॅनेलवर दिली. त्यामुळे उलटसूलट चर्चा रंगली.
3 / 7
रोहित शर्मा सराव शिबिरात नसल्याने शुभबन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी फलंदाजीचा सराव केला. या जोडीने जवळपास अर्धा तास घाम गाळला.
4 / 7
गिल आणि यशस्वीच्या फलंदाजीनंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्याच्यासोबत अजिंक्य रहाणे यानेही सराव केला. विराट आणि रहाणे बऱ्याच कालावधीनंतर एकत्र सराव करताना दिसले.
5 / 7
विराट आणि रहाणे सराव पूर्ण झाल्यावर इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनीही खेळपट्टीवर आपली कसब दाखवली. दोघांनी आक्रमकपणे फटकेबाजी केली.
6 / 7
गोलंदाजांच्या ताफ्यात असलेल्या मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट यांनी आपल्या गोलंदाजीला धार केली.
7 / 7
विमल कुमार यांच्या मते, रोहित शर्मा या शिबिरात भाग न घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे सराव पर्यायी होता. म्हणजेच भाग घ्यायचा की नाही हे खेळाडूंनी ठरवायचं होतं. कर्णधार रोहित शर्मा या पर्यायाचा फायदा घेतला. (ALL Photo: BCCI)