आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना होणार की नाही? केकेआर आरसीबी सामन्यापूर्वीच ‘बॅड न्यूज’

| Updated on: Mar 21, 2025 | 6:28 PM

आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावेळी स्पर्धेत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र असं असताना या स्पर्धेत केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणारा पहिला सामना होईल की नाही याबाबत शंका आहे.

1 / 5
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता येथे होणार आहे. पण कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडारसिकांचा भ्रमनिरास होऊ शकतो.

2 / 5
आयपीएलच्या 18व्या पर्वातील पहिल्या सामन्यात पाऊस पडू शकतो. अ‍ॅक्युवेदरच्या अहवालानुसार, शनिवारी पावसाची 90  टक्के शक्यता आहे. संध्याकाळी आर्द्रता 77 टक्के असेल तर वारे ताशी 22 किमी वेगाने वाहतील. त्यामुळे पाऊस पडला तर सामना सामना रद्द होऊ शकतो.

3 / 5
पहिल्या सामन्यापूर्वी एका भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, आयपीएलच्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड कलाकार परफॉर्मेन्स करणार आहेत. हवामानाचा अंदाज घेऊ 22 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

4 / 5
रात्री 9 ते 10  दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. तापमान सुमारे 23 ते 25 अंश सेल्सिअस असू शकते, तर वाऱ्याचा वेग ताशी 22 किलोमीटर असेल.

5 / 5
आयपीएल 2025 स्पर्धा 13 ठिकाणी 65 दिवसांत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएलमध्ये एकूण 12 डबल हेडर सामने खेळवले जातील. डबल हेडरचा पहिला सामना दुपारी 3.30 वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. (सर्व फोटो- टीव्ही 9 गुजराती)