सेल्फी मागणाऱ्या चाहत्याच्या प्रेमात पडली प्रसिद्ध टेनिसपटू, लवकरच अडकणार विवाहबंधनात
टेनिसस्टार गार्बिन मुगुरुझा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 2016 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2017 मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ख्याती सर्वदूर पसरली आहे. एका सेल्फीमुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.
1 / 8
सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढणे ही एक सामान्य गोष्ट आहे. ही वेळा चाहत्यांना आवडत्या स्टार्ससोबतच्या एका फोटोसाठी झगडावे लागते. पण इथे एका चाहत्याचं नशिबच पालटलं. एका सेल्फीमुळे प्रसिद्ध टेनिसपटू मोहीत झाला आणि प्रेमात पडली.
2 / 8
व्हेनेझुएला-स्पेनमधील प्रसिद्ध टेनिसपटू गार्बिन मुगुरुझा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तेही तिच्यासोबत सेल्फी काढलेल्या चाहत्यासोबत...
3 / 8
2016 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2017 मध्ये विम्बल्डन जिंकणारी गार्बिन मुगुरुझा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आता टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या मुगुरुझाने तिचा चाहता आर्थर बोर्जेसशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 / 8
आर्थर बोर्जेस आणि गार्बिन मुगुरुझा यांच्या परिचयाची सुरुवात एकाच सेल्फीने झाली. 2021 मध्ये, न्यूयॉर्कमध्ये फिरत असताना आर्थर बोर्जेस आला आणि सेल्फी मागितला. या सेल्फी क्लिकमुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.
5 / 8
प्रेमकथेबद्दल बोलताना गार्बिन मुगुरुझा म्हणाली की, मला आर्थर योगायोगाने मिळाला. माझे हॉटेल न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कजवळ होते. हॉटेलमध्ये कंटाळा आला म्हणून मी त्या दिवशी फिरायला गेले. यावेळी आर्थरशी एका सेल्फीनिमित्त भेट झाली.
6 / 8
माझ्याकडे येऊन सेल्फी काढणाऱ्या आर्थर बोर्जेसने यूएस ओपन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्या दिवशी आर्थरच्या बोलण्यापेक्षाही मला त्याच्या सौंदर्याने आकर्षित केले होते. यानंतर आम्ही दोघेही अनेकदा भेटलो.
7 / 8
व्यवसायाने मॉडेल असलेले आर्थर बोर्जेस नंतर माझा चांगला मित्र झाला. दोन वर्षांनंतर, त्याने मला स्पेनमध्ये प्रपोज केले. खरे सांगायचे तर मला अशा प्रपोजची अपेक्षा होती. गार्बिन मुगुरुझा यांनी त्याच्या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला.
8 / 8
गार्बिन मुगुरुझा-आर्थर बोर्जेस या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. गार्बिन मुगुरुझा हिने ही बातमी तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.