वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेपूर्वीच महिला क्रिकेट संघांसाठी आनंदाची बातमी आहे. विजेत्या संघाला पुरूष संघाप्रमाणे बक्षिसी रक्कम मिळणार आहे. आयसीसीने याबाबतची घोषणा केली आहे.
1 / 7
महिला टी20 वर्ल्डकप 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमधून यूएईमध्ये हलवण्यात आली आहे. या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे होतं. पण तिथल्या हिंसाचारामुळे आयसीसीने स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतला.
2 / 7
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार 3 ऑक्टोबरपासून अनुभवायला मिळणार आहे. ही स्पर्धा युएईत होणार असून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेपूर्वी बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. पुरुष संघांप्रमाणे आता कोट्यवधी रुपये महिला संघांना मिळणार आहेत.
3 / 7
आयसीसीने महिला टी20 वर्ल्डकप विजेच्या संघाला 19 कोटी 59 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही रक्कम पुरुषांच्या तुलनेत कमी होती. पण आता पुरुषांप्रमाणे महिलांना बक्षिसी रक्कम मिळणार आहे
4 / 7
टी20 विश्वचषक विजेत्या संघाला 19 कोटी आणि 59 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 9 कोटी 79 लाख रुपये मिळतील. गेल्या वर्षी उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाच लाख डॉलर्स मिळाले होते. आता या बक्षिसाची रक्कम 134 टक्क्यांनी वाढली आहे.
5 / 7
उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 5 कोटी 65 लाख रुपये मिळणार आहेत. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 2 लाख 10 हजार डॉलर्स देण्यात आले होते. आता स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम जवळपास 80 कोटी इतकी आहे.
6 / 7
महिला टी20 विश्वचषकात साखळी फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांना सुमारे बक्षिसी रक्कम दिली जाईल. प्रत्येक विजयावर ही रक्कम ठरणार आहे. ही रक्कम गुणतालिकेतील पोझिशनच्या आधारावर ठरेल.
7 / 7
अमेरिका वेस्ट इंडिज येथे मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा पार पडली होती. तेव्हा भारतीय संघाला 20.52 कोटी रुपयांचं बक्षिसी रक्कम मिळाली होती.