WPL 2024 Prize Money: वुमन्स प्रीमियर लीग विजेत्या संघावर होणार कोट्यवधी रुपयांची उधळण, जाणून घ्या बक्षीसाची रक्कम
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे. विजेत्या संघावर बक्षीसाच्या रुपाने पैशांचा पाऊस पडणार आहे. चला जाणून घेऊयात किती रुपये मिळणार ते..
1 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे. या पर्वातही एकूण 5 संघ सहभागी झाले होते. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या संघांचा यात समावेश आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे.
2 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. आता कोण विजेता ठरणार याची उत्सुकता आहे. तुम्हाला माहिती आहे का? विजेत्या संघाला किती रुपये मिळतात ते, नसेल तर जाणून घ्या.
3 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वात विजेत्या संघाला म्हणजेच मुंबई इंडियन्स संघाला 6 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये मिळाले होते.
4 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातही जेतेपदाच्या रकमेत काही वाढ केलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विजेत्या संघाला 6 कोटी आणि उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये मिळणार आहेत.
5 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 1 कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम मुंबई इंडियन्स संघाला मिळणार हे निश्चित झालं आहे.
6 / 6
संघासोबत गेल्या वर्षी खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक कामगिरीसाठीही पैसे मिळाले होते. प्लेयर ऑफ द सिझनसाठी 5 लाख, ऑरेंज कॅपसाठी 5 लाख रुपये, पर्पल कॅपसाठी 5 लाख, कॅच ऑफ द सिझनसाठी 5, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझन 5 लाख, पॉवरफुल स्ट्राईकर ऑफ द सिझन 5 लाख, प्लेयर ऑफ द मॅच (फायनल) 2.5 लाख, स्ट्रायकर ऑफ द मॅच 1 लाख रुपये.