World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करत भारताचा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या
ODI World Cup 2023 : अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये दोन दिग्गज संघांना पराभूत करत आपली चमक दाखवली आहे. तर भारताचा एक विक्रमही मोडीत काढला. पाकिस्तानला पराभूत करत हा विक्रम मोडला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या.
1 / 6
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर शानदार विजय नोंदवला. स्पर्धेत दुसऱ्यांदा मोठा उलटफेर अफगाणिस्तानने केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं.
2 / 6
अफगाणिस्तानने हे आव्हान 2 गडी गमवून 49 व्या षटकात पूर्ण केलं. पाकिस्तानवर 8 गडी आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे.
3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. 2003 मध्ये पाकिस्तानने भारतासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आव्हान भारताने गाठत इतिहास रचला होता.
4 / 6
अफगाणिस्तानने आता भारताचा विक्रम मोडीत काढला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान समोर 283 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठल्याने अफगाणिस्तानच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.
5 / 6
वनडे वर्ल्डकप इतिहासात पाकिस्ताने 275 हून अधिक धावा केल्या तेव्हा एकदाही पराभूत झाल नाही. मात्र यावेळी अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केलं.
6 / 6
अफगाणिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. अफगाणिस्तानने पाच पैकी 2 सामने जिंकले आहेत. पण उर्वरित 4 पैकी 4 सामने जिंकणं गरजेचं आहे.