World Cup 2023 : गौतम गंभीर याने बाबर आझम याच्याबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला..

| Updated on: Oct 02, 2023 | 11:05 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान जेतेपदासाठी एक प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आशिया कप चषकातील पराभवानंतर संघाचं मनोधैर्य खचलं आहे. तरी संघ चांगली कामगिरी करेल अशी क्रीडा पंडितांनी आशा व्यक्त केली आहे. दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही बाबर आझम बाबत एक भाकीत वर्तवलं आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगली कामगिरी करेल, असं भाकीत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त केलं आहे. बाबर आझम सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे चमकदार कामगिरीची अपेक्षा वर्तवली जात आहे.

2 / 6
एका मुलाखतीत गौतम गंभीर याने सांगितलं की, बाबर आझम आक्रमक खेळी करताना दिसेल. तसेच काही शतकं ही तो ठोकू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

3 / 6
बाबर आझम या वर्ल्डकप स्पर्धेत किमान 3 ते 4 शतकं झळकावेल अशी खात्री गौतम गंभीर याला आहे. आता बाबर कशी कामगिरी करतो हे लवकरच समोर येईल.

4 / 6
गौतम गंभीर याने अनेकदा बाबर आझमच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. बाबर आझम हा काही मोजक्या खेळाडूंपैकी आहे. तो आपल्या फलंदाजीने नक्कीच चांगली कामगिरी करेल, असंही त्याने सांगितलं.

5 / 6
बाबर आझम पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. त्यामुळे आता त्याची भारतात खेळी कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. भारताचा पाकिस्तानसोबत सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे.

6 / 6
वनडे क्रिकेटमध्ये बाबर आझम आतापर्यंत 105 सामने खेळला असून 6069 धावा केल्या आहेत. यात 19 शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.