World Cup 2023 : टीम इंडियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा होता? पहिल्या सामन्यापासून जाणून घ्या सर्वकाही
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत टीम इंडियाने प्रवेश केला आहे. इथपर्यंतच्या प्रवासात टीम इंडियाने एकही सामना गमवला नाही. स्पर्धेतील सर्वच संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर न्यूझीलंड संघाला दोन पराभूत करत 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचा वचपाही काढला आहे. चला जाणून घेऊयात अंतिम फेरीपर्यंत टीम इंडियाचा प्रवास कसा होता ते..
1 / 10
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखलं. पण टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. पण विराट कोहली आणि केएल राहुलने जबरदस्त खेळी केली.
2 / 10
भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा केल्या. टीम इंडियाने हे आव्हान 35 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावा केल्या.
3 / 10
भारताचा तिसरा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पाकिस्तानला 42.5 षटकात सर्वबाद करत 191 धावांवर रोखलं. पाकिस्तानने दिलेलं आव्हान टीम इंडियाने 3 गडी गमवून 30.3 षटकात पूर्ण केलं. यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनी चांगली खेळी केली.
4 / 10
भारताचा चौथा सामना बांगलादेशशी झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 256 धावा केल्या. भारताने हे आव्हान 41.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. विराट कोहली नाबाद 103, शुबमन गिल 53 आणि रोहित शर्माने 48 धावा केल्या.
5 / 10
भारताचा पाचवा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला 50 षटकात 273 धावांवर रोखलं. हे आव्हान टीम इंडियाने 6 गडी गमवून 48 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहली 95, रोहित शर्मा 46 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या.
6 / 10
भारताचा सहावा सामना इंग्लंडशी झाला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 229 धावा केल्या. पण इंग्लंडचा संघ 34.5 षटकात 129 धावांवर ऑलआऊट झाला. शमीने 4, बुमराहने 3 आणि कुलदीपने 2 विकेट घेतल्या.
7 / 10
भारताचा सातवा सामना श्रीलंकेशी झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. टीम इंडियाने 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. पण श्रीलंकन संघ 19.4 षटकात सर्वबाद 55 धावा करू शकला.
8 / 10
भारताचा आठवा सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आणि 50 षटकात 5 गडी गमवून 326 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेचा संघ 83 धावांवर ऑलआऊट झाला. रवींद्र जडेजाने 5, कुलदीपने 2 आणि शमीने 2 गडी बाद केले.
9 / 10
भारताचा नववा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी केली. 50 षटकात 4 गडी गमवून 410 धावा केल्या. तसेच नेदरलँडला 47.5 षटकात 250 धावांवर ऑलआऊट केलं.
10 / 10
उपांत्य फेरीत भारताची लढत न्यूझीलंडशी झाली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. तर न्यूझीलंडला 48.5 षटकात सर्वबाद 327 धावा करता आल्या. त्यामुळे 70 धावांनी न्यूझीलंडचा पराभव झाला.