IND vs PAK : वनडेत रोहित शर्माच्या नावावर आणखी विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

| Updated on: Oct 14, 2023 | 7:49 PM

IND vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोज कोणतारी विक्रम रचला जातो आणि मोडला जातो. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या

1 / 6
वनडे वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसून आला. पाकिस्तानला 191 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा याने एका विक्रमाची नोंद केली आहे.

2 / 6
कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. पण कमबॅक करत अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकलं. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध खेळत वनडेत सिक्सचा आणखी एक विक्रम नोंदवला.

3 / 6
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाच षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला होता. ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला होता.

4 / 6
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 3 षटकार ठोकत रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

5 / 6
रोहित शर्मा याने 254 सामन्यात ही कामगिरी केली आहे. भारताकडून या  यादीत 229 षटकारांसह महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. तर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानी आहे.

6 / 6
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाहीद आफ्रिदी अव्वल स्थानी आहे. त्याने 351 षटकार मारले आहेत. तर ख्रिस गेल 331 षटकारांसह दुसऱ्या स्थानी, तर रोहित शर्मा 300 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.