वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा सातवा सामना श्रीलंकेशी होत आहे. भारताने या सामन्यात 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात विराट, गिल आणि श्रेयस अय्यर यांचं शतकं हुकलं. पण श्रेयस अय्यरने एक विक्रम नोंदवला आहे.
श्रेयस अय्यर याला गेल्या काही दिवसांपासून सूर गवसत नव्हता. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 53 धावांची खेळी केली. पण त्यानंतर हवी तशी कामगिरी केली नाही. आता श्रीलंके विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे.
चौथ्या क्रमांकावर खेळताना श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावा केल्या. शतक अवघ्या 18 धावांनी हुकलं असंच म्हणावं लागेल. तसेच वनडे फॉर्मेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या.
श्रेयस अय्यरने या खेळीसह ऑस्ट्रेलियाच्य ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकलं आहे. या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार मारला आहे. श्रेयस अय्यरने एकूण 6 षटकार ठोकले. त्यापैकी एक खूपच लांब मारला.
श्रेयस अय्यरने 106 मीटर लांब षटकार मारला आहे. यापूर्वी हा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने 104 मीटर लांब षटकार मारला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरच असून 101 मीटर लांब षटकार मारला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज