AUS vs NED : नेदरलँडच्या बास डी लीडेच्या नावावर नकोसा विक्रम, पंगतीत पहिल्या स्थानी
AUS vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी विजय मिळवला. नेदरलँडच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. बास डी लीडेच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 24 वा सामना नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियाने नेदरलँडसमोर विजयासाठी 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नेदरलँडचा संपूर्ण संघ 90 धावांवर ऑलआउट झाला.
2 / 6
ऑस्ट्रेलियाने डेथ ओव्हरमध्ये नेदरलँडच्या गोलंदाजांची पिसं काढली. ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक ठोकलं. नेदरलँडच्या गोलंदाजांची काय अवस्था केली, ते यावरूनच स्पष्ट होतं.
3 / 6
नेदरलँडचा अष्टपैलू खेळाडू बास डी लीडे याच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या सामन्यात त्याने सर्वात महागडा स्पेल टाकला. वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट विक्रम आहे.
4 / 6
बास डी लीडे याने 10 षटकात 115 धावा दिल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या एडम झाम्पा आणि मिक लुईसच्या नावावर असलेला नकोसा विक्रम मागे टाकला. (Photo : AP)
5 / 6
ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईस याने 2006 साली आमि एडम झाम्पा याने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 10 षटकात 113 धावा दिल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.
6 / 6
नेदरलँडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. कारण आता सर्वच्या सर्व सामने जिंकले तरी नेट रनरेट वाढवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे उर्वरित चार सामने फक्त औपचारिकता असेल. (Photo : ANI)