World Cup 2023 दरम्यान शाहीन अफ्रिदी याने रचला इतिहास
Shaheen Shah Afridi Icc World Cup 2023 | पाकिस्तानचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी याने धमाका केलाय. शाहीनने वर्ल्ड कपमध्ये मोठी कामगिरी करत इतिहास रचलाय.
1 / 5
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याने वर्ल्ड कप दरम्यान इतिहास रचलाय. शाहिनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शाहिन आयसीसी बॉलिंग वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ठरलाय. शाहीनने थेट 7 स्थानांची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याला पछाडलंय.
2 / 5
शाहिनने बांगलादेश विरुद्ध 23 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच शाहिनने विकेट्सचं शतकही पूर्ण केलं. शाहिनने 51 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारा एकूण तिसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
3 / 5
शाहिन मार्को जान्सेन आणि एडम झॅम्पा तिघेही 16 विकेट्ससह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. तर टीम इंडिया मोहम्मद सिराज तिसऱ्या आणि कुलदीप यादव सातव्या क्रमांकावर आहेत.
4 / 5
आयसीसी वनडे बॅट्समन रँकिंगमध्ये पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम अव्वलस्थानी आहे. तर शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलराउंडर्स यादीत बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन नंबर 1 आहे.
5 / 5
शाहिनने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत . मात्र त्याला अजून अपेक्षित छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचं संकट आहे.