SA vs AUS : क्विंटन डिकॉकने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दाखवला इंगा, शतक ठोकत रचले विक्रम

| Updated on: Oct 12, 2023 | 6:35 PM

World Cup 2023, SA vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दहावा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु आहे. या सामन्यात क्विंटन डिकॉक याने सलग दुसरं शतक ठोकलं. तसेच काही विक्रम आपल्या नावावर केले.

1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत क्विंटन डिकॉक चांगलाच फॉर्मात आहे. सलग दोन शतकं ठोकत त्याने आपला इरादा स्पष्ट केला आहे. श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं आहे. तसेच काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo- Twitter)

2 / 6
डिकॉकने 90 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यात त्याने 5 षटकार आणि 8 चौकार मारले. तसेच पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर षटकार मारत शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध डिकॉकचं तिसरं शतक आहे.  (Photo- Twitter)

3 / 6
दक्षिण आफ्रिकेसाठी सलामी येत त्याने कारकिर्दितलं 19वं शतक ठोकलं आहे. सलामीला सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या हाशिम अमला याने 27 शतकं ठोकली आहेत. (Photo- Twitter)

4 / 6
वनडे वर्ल्डकपमधील डिकॉकचं दुसरं शतक आहे. त्याने हाशिम अमला, फाफ डुप्लेसिस आणि हर्शल गिब्स यांची बरोबरी केली आहे. त्यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये दोन शतकं ठोकली आहेत. तर 4 शतकांसह डिव्हिलियर्स पहिल्या स्थानावर आहे. (Photo- Twitter)

5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे सर्वात मोठं शतक आहे. यापूर्वी हर्शल गिब्सने 101 धावांची खेळी केली होती. आता 109 धावा करत डिकॉक पहिल्या स्थानावर आहे. (Photo- Twitter)

6 / 6
दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमवून 311 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं आहे. आता आव्हान ऑस्ट्रेलिया गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- Twitter)