श्रेयस अय्यरने मोडला युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम, जाणून घ्या काय ते

| Updated on: Nov 06, 2023 | 5:30 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध शू्न्यावर बाद झाल्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कमबॅक केलं. त्यानंतर हवी तशी फलंदाजी झाली नाही. श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली. इतकंच काय तर युवराज सिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.

1 / 6
वनडे वर्ल्डकपमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. पण सुरुवातीच्या काही सामन्यात त्याच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. पण श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला लय सापडली आहे.

2 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीसोबत 134 धावांची भागीदारी केली. तसेच फलंदाजीला कठीण अशा पिचवर 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. वर्ल्डकपमधील तिसरं अर्धशतक झळकावलं

3 / 6
तीन अर्धशतकांच्या जोरावर श्रेयस अय्यरने युवराज सिंग, सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा यांना मागे टाकलं आहे. चौथ्या क्रमांकावर खेळत त्याने ही कामगिरी केली आहे.

4 / 6
चौथ्या स्थानावर खेळताना सचिन, अजय जडेजा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन अर्धशतकं ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरचा 31 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

5 / 6
श्रेयस अय्यरने 2023 वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानावर खेळताना 3, सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये 2, अजय जडेजाने 1999 मध्ये 2 आणि युवराज सिंगने 2011 मध्ये 2 अर्धशतकं ठोकली आहेत.

6 / 6
सचिन तेंडुलकरने 1992 च्या वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानावर खेळताना 229 धावा केल्या होत्या. आता श्रेयस अय्यरने चौथ्या स्थानावर खेळताना 293 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणने 2015 मध्ये 208, विराट कोहलीने 2011 मध्ये 202 धावा केल्या आहेत.