World Cup 2023 : उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला आता फक्त इतकं करावं लागेल, जाणून घ्या समीकरण
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरीवर दावा ठोकला आहे. पण अजूनही स्पर्धेत चार सामने बाकी आहेत. त्यामुळे पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरी रॉबिन राउंड पद्धतीने खेळली जात आहे. प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. तर गुणतालिकेत टॉप 4 ला असलेले संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. भारताने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.
2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
3 / 6
उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत.
4 / 6
टीम इंडियाने चार पैकी एक जरी सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिका आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना असेल.
5 / 6
चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियाला सोपं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आरामात स्थान मिळवेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित होईल.
6 / 6
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.