IND vs ENG : असा रेकॉर्ड नको रे बाबा! विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी

| Updated on: Oct 29, 2023 | 4:11 PM

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. त्यामुळे विराट कोहलीची नको त्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली. इतकंच काय तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी बरोबरी साधली आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. विराट कोहली याने एक शतक ठोकलं आहे. तर दोन शतकं थोड्याशा फरकाने हुकली आहे. असं असलं तरी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

2 / 6
विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 9 चेंडुंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. विराट कोहली डेविड विलेच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन बाद झाला.

3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला आहे. आतापर्यंत विराट कोहलीने 100, 8, 34, 12, 1, 59, 24, 9, 35, 107, 46, 33, 33, 44, 38, 3, 1, 18, 82, 77, 67, 72, 66, 26, 34, 1, 85, 55, 16, 103, 95 अशा धावा केल्या आहेत. पण आता यात शून्याची भर पडली आहे.

4 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली इंग्लंड विरुद्ध 11 व्यांदा शून्यावर बाद झाला आहे

5 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही 34 वी वेळ आहे. यामुळे सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिन सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

6 / 6
भारताकडून झहीर खान हा आघाडीवर आहे. तो 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर इशांत किशन (40), हरभजन सिंग (37), अनिल कुंबले (35), विराट कोहली (34) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (34) असे शून्यावर बाद झाले आहेत.