वेस्ट इंडिजच्या नावावर नकोसा विक्रम, टी20 क्रिकेटच्या नको त्या यादीत स्थान
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार रंगला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांची धडपड सुरु आहे. पण वेस्ट इंडिजला मायदेशातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे पुढचा प्रवास बिकट झाला आहे. असं असताना या पराभवामुळे वेस्ट इंडिजला नको त्या पंगतीत स्थान मिळालं आहे.