ENG vs NZ : वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने रचला इतिहास, पहिल्यांदाच घडलं असं काही
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये असा कारनामा यापूर्वी कधीच झाला नव्हता. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..
1 / 5
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. हे आव्हान न्यूझीलंड सहज गाठेल अशी स्थिती आहे.
2 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने फलंदाजीत विश्व विक्रम रचला आहे. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये असं कधीच झालं नव्हतं.इंग्लंडच्या सर्व 11 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.
3 / 5
इंग्लंडच्या सर्वच्या सर्व 11 फलंदाजांनी फलंदाजी करत हा विक्रम केला आहे. प्रत्येकाने 10 हून अधिक धावा केल्या. असं वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं आहे.
4 / 5
जॉनी बेयरस्टो (33), डेविन मलान (14), हॅरी ब्रूक (25), मोइन अली (11), जोस बटलर (43), जो रूट (77), लियाम लिविंगस्टोन (20), ख्रिस वोक्स (11), सॅम करन (14), आदिल राशिद 15 आणि मार्क वूडने (13) धावा केल्या.
5 / 5
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड (सर्व फोटो: England Cricket Twitter)