6,6,6,6,6,6…निकोलस पूरनचं झंझावती शतक, आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत दुसरा धमाका

| Updated on: Jun 26, 2023 | 10:33 PM

वेस्ट इंडिज संघ वनडे वर्ल्डकपमध्ये क्वॉलिफाय होण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे. आयसीसी वर्ल्डकप क्वॉलिफायर 2023 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने नेदरलँड विरुद्ध 50 षटकात 6 गडी गमवून 374 धावा केल्या. या सामन्यात निकोलस पूरनने दुसरं शतक ठोकलं.

1 / 6
ICC विश्वचषक पात्रता 2023 फेरीत वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याने शतक झळकावले. या सामन्यात नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र हा निर्णय चांगलाच महागात पडला.

2 / 6
ब्रेंडन किंग (76) आणि जॉन्सन चार्ल्स (54) यांनी डावाची सुरुवात करणाऱ्या वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघं बाद झाल्यानंतर शाई होप आणि निकोलस पूरन यांनी शानदार खेळी केली.

3 / 6
शाई होप 38 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 47 धावा करून बाद केल्या. पण दुसरीकडे तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या पूरनने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना अस्मान दाखवले.

4 / 6
पूरनच्या स्फोटक फलंदाजीमुळे नेदरलँडच्या गोलंदाजांनी आपली लय गमावली. डावखुऱ्या फलंदाजाने 6 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार लगावले.

5 / 6
पूरनने अवघ्या 63 चेंडूत शानदार शतक पूर्ण केलं. त्याने  65 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावून 374 धावा केल्या.

6 / 6
निकोलस पूरनचे वनडे विश्वचषक पात्रता फेरीतील हे दुसरे शतक आहे. याआधी त्याने नेपाळविरुद्ध 94 चेंडूत 115 धावा केल्या होत्या. आता त्याने नेदरलँड्सविरुद्ध 65 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या.