Team India Wtc Schedule : 6 मालिका आणि 18 सामने, टीम इंडियाचं चौथ्या साखळीतील वेळापत्रक

| Updated on: Jan 06, 2025 | 7:01 PM

Team India Wtc Cycle 2025 2027 Schedule : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पोहचण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत स्वप्नभंग केलं. आता टीम इंडिया या चौथ्या साखळीत एकूण 6 मालिकांमध्ये 18 सामने खेळणार आहे. पाहा वेळापत्रक.

1 / 8
टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला. टीम इंडियाने या पराभवासह ही मालिका 1-3 अशा फरकाने गमावली. तसेच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीच्या अंतिम फेरीतून बाहेर झाली. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)

2 / 8
आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत 6 संघांविरुद्ध  एकूण 18 कसोटी सामने खेळणार आहे. नियमांनुसार टीम इंडियाला मायदेशात 3 तर परदेशात 3 कसोटी मालिका खेळायच्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 8
टीम इंडिया या तिसऱ्या साखळीतील मोहिमेची सुरुवात इंग्लंड विरुद्ध करणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान ही मालिका पार पडेल.  (Photo Credit : Bcci)

4 / 8
त्यानंतर टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये मायदेशात विंडीजविरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. (Photo Credit : icc X Account)

5 / 8
टीम इंडिया या साखळीतील तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात एकूण 2 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. (Photo Credit : Bcci)

6 / 8
टीम इंडिया त्यानंतर 2026 मध्ये थेट ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. (Photo Credit : Bcci)

7 / 8
टीम इंडियाला श्रीलंकेनंतर न्यूझीलंड दौरा करायचा आहे. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 दरम्यान 2 कसोटी सामने खेळणार आहे. (Photo Credit : Bcci)

8 / 8
तर टीम इंडिया या साखळीतील शेवटची मालिका मायदेशात खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर येईल. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 सामने खेळवण्यात येतील. ही मालिका जानेवारी ते फेब्रुवारी 2027 दरम्यान पार पडेल. (Photo Credit : icc)