वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाल्या झाल्या या खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपली! वाचा कोण आहेत खेळाडू
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारताच्या पदरी निराशा पडली आहे. सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. ज्येष्ठ खेळाडूंचा सुस्तपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आता संघात तरुण खेळाडूंना संधी देणार असल्याचं दिसत आहे.
1 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजत सर्व फॉर्मेटमध्ये आयसीसी चषक पटकवल्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
2 / 7
2013 मध्ये भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सलग 10 वर्षे भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे.
3 / 7
बीसीसीआय आता तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघातील सिनिअर खेळाडूंचं वय आणि सुस्तावलेपणा पाहून त्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर काही खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे.
4 / 7
एमएस धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वृद्धिमान साहा हा मुख्य यष्टिरक्षक होता. मात्र, ऋषभ पंत संघात सामील झाल्यानंतर त्याची जागा घेण्यात आली. आता केएस भरत आणि ईशान किशन देखील सघात आहेत. त्यामुळे साहाची निवृत्ती जवळपास निश्चित आहे.
5 / 7
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि इतर काही युवा वेगवान गोलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे इशांतचे संघात पुनरागमन कठीण आहे. त्यामुळे तो लवकरच निरोप घेण्याची शक्यता आहे.
6 / 7
मयंक अग्रवालची मार्च 2022 नंतर कसोटी सामन्यासाठी निवड झालेली नाही. टीम इंडियात सलामीवीर पदासाठी शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे आगामी काळात मयंकला जागा मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
7 / 7
टीम इंडियाचा दुसरा वेगवान गोलंदाज उमेश यादवची कसोटी कारकिर्दही संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. त्याने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याची यापुढे निवड होणार याबाबत साशंकता आहे.