WPL Eliminator 2023, Mumbai vs UP | मुंबई की यूपी, कोण मारणार अंतिम फेरीत धडक?
वूमन्स प्रीमिअर लीग 2023 या स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडेल.
1 / 6
वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स आधीच अंतिम फेरीत पोहचली आहे. आता दिल्ली विरुद्ध अंतिम फेरीत खेळणारी दुसरी टीम आज ठरणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम ट्रॉफीसाठी दिल्ली विरुद्ध भिडणार आहे. मुंबई आणि यूपी आतापर्यंत 2 वेळा आमनेसामने आले आहेत. या पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. आता या एलिमिनेटर सामन्याचा निकाल हा 5 खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे.
2 / 6
मुंबई इंडियन्सच्या साईका इशाक हीच्यासाठी हा पहिला हंगाम फार शानदार ठरला. साईका हीने 8 पैकी 5 सामन्यात विकेट्स घेतल्या. तिने आतापर्यंत एकूण 13 विकेट्स घेतल्या आहेत. साईकाने साखळी फेरीत यूपी विरुद्ध 3 विरुद्ध विकेट्स घेतल्या. यात ऐलिसा हीवी आणि ताहलिया मॅक्ग्रा या महत्वाच्या फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश होता. त्यामुळे साईकाकडून या एलिमिनेटर सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
3 / 6
यूपीची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टन ही या पर्पल कॅप विनर आहे. तिने आतापर्यंत एकूण 8 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. सोफीने लीग राउंडमधील प्रत्येक सामन्यात विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना सोफीपासून सांभाळून खेळावं लागणार आहे.
4 / 6
मुंबई इंडियन्सची ऑलराउंडर हॅली मॅथ्यूज हीने आतापर्यंत आपली छाप सोडली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर तिन्ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हॅलीने 8 सामन्यात 12 विकेट्स आणि 232 धावा केल्या आहेत. त्यामुळे यूपीसमोर हॅलीचं आव्हान असणार आहे.
5 / 6
यूपीच्या फलंदाजीची धुरा ही ताहलिया मॅक्ग्रा हीच्या खांद्यावर आहे. ताहलिया हीने 8 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजांसमोर ताहलिया हीला रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
6 / 6
अमेलिया कीर ही विकेट्स घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. मुंबईच्या या बॉलरने 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. अमेलिया हीने यूपी विरुद्धच्या 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहे. दोन्ही संघ तोडीसतोड आहेत. त्यामुळे आता कोण कोणावर वरचढ ठरणार, हे अवघ्या काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे.