WPL 2023 | क्रिकेट विश्वात वूमन्स आयपीएलची एकच चर्चा, 24 तासात 4 खेळाडूंची चमकदार कामगिरी
वूमन्स प्रीमिअर लीगमुळे क्रिकेटपटूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. आतापर्यंत पहिल्या 3 सामन्यात 4 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
1 / 5
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेला 4 मार्चपासून धडाक्यात सुरुवात झालीय. या हंगामात आतापर्यंत 3 सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलंय. अवघ्या 2 दिवसांमध्ये वूमन्स प्रीमिअर लीगने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. वूमन्स आयपीएलने 2 दिवसातच 4 सुपरस्टार दिले आहेत. या 4 ही खेळाडूंना डब्ल्यूपीएलमुळे नवी ओळख मिळाली आहे.
2 / 5
या मोसमातील सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईने हा सामना 143 धावांच्या फरकाने जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला. या सामन्यात मुंबईच्या सायका इशाक हीने 4 विकेट्स घेतल्या.
3 / 5
तसेच दुसरा सामना हा दिल्ली विरुद्ध आरसीबी यांच्यात पार पडला. दिल्लीने ही मॅच 60 धावांनी जिंकली. या सामन्यात दिल्लीकडून शफाली वर्मा हीने 84 तर कॅप्टन मॅग लॅनिंगने 72 धावांची खेळी केली. त्यानंतर तारा नॉरीसने 5 विकेट्स घेतल्या. ताराने यासह स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा 5 विकेट्स घेण्याचा बहुमान मिळवला.
4 / 5
तिसऱ्या सामन्यात गुजराय जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने भिडले. यूपीने 3 विकेट्स विजय मिळवला. गुजरातचा 24 तासातला सलग दुसरा पराभव ठरला. ग्रेस हॅरीस मॅन ऑफ द मॅच ठरली. ग्रेसने निर्णायक क्षणी नाबाद अर्धशतक ठोकत गुजरातच्या हाता तोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला.
5 / 5
ग्रेस हॅरीसच्या आधी मराठमोळ्या किरण नवगिरे हीने अर्धशतकी खेळी केली. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने गमावल्याने यूपी अडचणीत सापडली. मात्र किरणने मैदानात उभी राहता यूपीचा डाव सावरला. तसेच अर्धशतकही ठोकलं. किरणने यासह आपल्या जिल्ह्याचं अर्थात सोलापूरचं नाव केलं.