WPL 2024 Point Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सला धोबीपछाड, गुजरातवर विजय मिळवताच टाकलं मागे

| Updated on: Feb 28, 2024 | 4:18 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने पार पडले आहेत. त्यानंतर आतापासून टॉप पोझिशनची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांनी दोन पैकी दोन सामने जिंकत चार गुण मिळवले आहेत. पण नेट रनरेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारत पहिलं स्थान पटकावलं आहे.

1 / 6
पहिल्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यावर मात करत यंदा स्मृती मंधानाच्या नेतृत्वात टीम चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात युपी वॉरियर्सला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सला पराभवाचं पाणी पाजलं. मागच्या पर्वात बंगळुरुला 8 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला होता.

2 / 6
स्पर्धेत यूपी वॉरियर्सविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या आरसीबी संघाने 2 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला. पण गुजरातने दिलेली धावसंख्या 12.3 षटकात पूर्ण केली. त्यामुळे नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे समान गुण असून मागे टाकलं आहे.

3 / 6
गुजरात जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 107 धावा केल्या आणि विजयासाठी 108 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 गडी गमवून आमि 45 चेंडू राखून पूर्ण केलं. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने 43 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत सोफी मोलिनेक्सने 3 आणि रेणुका ठाकूरने 2 बळी घेतले.

4 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दोन सामन्यात विजय मिळवत चार गुण मिळवले. तसेच नेट रनरेट +1.665 इतका आहे. तर  मुंबई इंडियन्सनेही आपले दोन्ही सामने जिंकले. मुंबई 4 गुण आणि +0.488 नेट रनरेटसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामने खेळले आहेत. एक सामना जिंकला, तर एक सामना गमावला आहे. त्यामुळे 2 गुण आणि 1.222 च्या धावगतीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6
गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सने पहिले दोन सामने गमावले आहेत. या दोन्ही संघांनी खाते न उघडता गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.