स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आरसीबीने टाकले फासे, या खेळाडूला आपल्या संघात केलं सामील

| Updated on: Jan 16, 2025 | 4:16 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी 18 सदस्यीय संघ निवडला आहे. यावेळी आरसीबी संघात एकूण 6 नवीन खेळाडूंनी प्रवेश केला. त्यापैकी चार खेळाडू मिनी लिलावात निवडले गेले, तर एक लिलावापूर्वी खरेदी करण्यात आला. आता चार्ली डीन बदली खेळाडू म्हणून आरसीबी संघात सामील झाली आहे.

1 / 5
महिला प्रीमियर लीगचं तिसरं पर्व सुरू होण्यापूर्वी आरसीबीची स्टार खेळाडू सोफी मोलिनेक्सला संघातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मॉलिनेक्सने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आरसीबीने बदली खेळाडूची निवड केली आहे.

2 / 5
सोफी मोलिनेक्सच्या जागी इंग्लंडच्या चार्ली डीनला संघात स्थान मिळालं आहे. 24 वर्षीय चार्ली डीनने यापूर्वी 30 लाख रुपये किमतीसह मिनी लिलावात उतरली होती.पण कोणत्याही फ्रँचायझीने इंग्लंडच्या खेळाडूला विकत घेतले नाही. पण आता तिच्या नशि‍बाचं दार खुललं आहे.

3 / 5
सोफी मोलिनक्स संघातून आऊट झाल्यानंतर आरसीबीने इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला संघात समाविष्ट केले आहे. इंग्लंड आणि लंडन स्पिरिट संघांकडून खेळलेल्या चार्ली डीनची ही पदार्पण महिला प्रीमियर लीग आहे हे विशेष.

4 / 5
इंग्लंडकडून 36 टी20 सामने खेळणाऱ्या चार्ली डीनने आतापर्यंत 46 विकेट घेतल्या आहेत. यासह तिने 12 डावात 135 धावा केल्या आहेत. त्यामुळे सोफी मॉलिनक्सच्या जागी चार्ली डीन हा आरसीबी संघाचा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

5 / 5
आरसीबी महिला संघ : स्मृती मंधाना, एलिस पेरी, रिचा घोष, रेणुका सिंग, जॉर्जिया वेरेहम, सोफी डिव्हाईन, केट क्रॉस, सबिनेनी मेघना, प्रियंका पाटील, आशा शोभना, एकता बिश्त, कनिका आहुजा, डॅनियल व्याट, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, राघवी बिस्त, जगरवी पवार, चार्ली डीन.