WTC 2023-2025: आयसीसीकडून कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसर्‍या पर्वाचे वेळापत्रक जारी, वाचा कोण किती सामने खेळणार ते

| Updated on: Jun 15, 2023 | 3:49 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं. आता तिसऱ्या पर्वाची तयारी सुरु झाली आहे. या वर्षात 9 संघ दोन वर्षात 27 मालिकांमध्ये 68 कसोटी सामने खेळणार आहेत.

1 / 13
टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशिप जेतेपदावर नाव कोरलं. आता कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेने सुरूवात होणार आहे.

2 / 13
आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. या पर्वात कोणता संघ किती सामने खेळणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ लॉर्ड्सच्या मैदानावर जेतेपदासाठी सामना करतील.

3 / 13
आयसीसीने जारी केलेल्या माहितीनुसार, नऊ संघ दोन वर्षांत 27 मालिकांमध्ये 68 कसोटी सामने खेळणार आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ सहभागी होणार आहेत.

4 / 13
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत दोन ते पाच कसोटी सामने असणार आहे. प्रत्येक नऊ संघ सहा मालिका खेळणार आहेत. यातील तीन मालिका मायदेशात खेळल्या जातील, तर उर्वरित तीन मालिका परदेशात खेळल्या जातील.

5 / 13
भारत 2023-25 ​​या तिसर्‍या पर्वात 19 सामने खेळणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2, इंग्लंडविरुद्ध 5, बांगलादेशविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळणार आहेत. अखेरीस, भारत दौऱ्याचा समारोप ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेने होईल.

6 / 13
पाकिस्तान संघही 14 सामने खेळणार आहे. यामध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा सामना घरच्या मैदानावर होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी सामना त्यांच्या धर्तीवर होणार आहे.

7 / 13
इंग्लंड 21 कसोटी सामने खेळणार आहे, 10 मायदेशात आणि 11 बाहेर असणार आहेत. वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात यजमानपद भूषवतील. तर  भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्या देशांमध्ये प्रवास करतील.

8 / 13
गतविजेता ऑस्ट्रेलिया संघही 19 सामने खेळणार आहे. त्यापैकी नऊ सामने परदेशात तर 10 सामने मायदेशात खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघ परदेश दौऱ्यात इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेत जाणार आहे. तर भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे मायदेशी येतील.

9 / 13
वेस्ट इंडिज 13 सामने खेळणार आहे .घरच्या मैदानावर भारत, आफ्रिका, बांगलादेश या संघांशी लढत असेल. तकर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान यांच्याशी त्या त्या देशात सामना असेल.

10 / 13
बांगलादेश 12 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत दौऱ्याचं यजमानपद असेल. तर भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत.

11 / 13
दक्षिण आफ्रिका 12 कसोटी सामने खेळणार असून तीन आशियाई संघ पाकिस्तान, श्रीलंका आणि भारताशी होम ग्राउंडवर लढत असेल. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीही संघ दौरा करणार आहे.

12 / 13
श्रीलंका 12 सामने खेळणार असून घरच्या मैदानावर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानशी भिडणार आहे. तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशचा दौरा करणार आहेत.

13 / 13
न्यूझीलंडचा संघ 14 सामने खेळणार आहे.ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांशी मायदेशात सामना होणार आहे. तसेच भारत, बांगलादेश, श्रीलंका या देशात दौरा करणार आहेत.