WTC 2023 Final Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारतात कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा

| Updated on: Jun 06, 2023 | 3:39 PM

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन वर्षानंतर अंतिम फेरीचा सामना असतो. त्यामुळे जेतेपदावर कोण नावर कोरणार? याची उत्सुकता आहे.

1 / 7
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. हा सामना 7 ते 11 जून या कालावधीत होणार असून यासाठी काही तास उरले आहेत. (Photo : ICC Twitter)

2 / 7
दोन्ही संघ आधीच लंडनमधील प्रतिष्ठित केनिंग्टन ओव्हल मैदानावर पोहोचले असून सरावात व्यस्त आहेत. टीम इंडिया नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.(Photo : ICC Twitter)

3 / 7
143 वर्षांचा इतिहास असलेल्या ओव्हल मैदानावर पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होत आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना कशी साथ देईल, हे अद्याप कळलेले नाही.(Photo : ICC Twitter)

4 / 7
टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली तर क्रिकेटच्या इतिहासात अन्य कोणताही संघ करू शकणार नाही असा दुर्मिळ विक्रम नावावर होणार आहे. (Photo : ICC Twitter)

5 / 7
भारताने ऑसीजविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप जिंकली तर ते वनडे, टी-२० आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनेल. याशिवाय भारतीय संघाने 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे आयसीसी चषकांचा दुष्काळही संपून जाईल. (Photo : ICC Twitter)

6 / 7
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे भारताची आणि इंग्लंडच्या वेळेमध्ये फरक आहे. इंग्लंडमध्ये सामना सकाळी 10:30 वाजता सुरू झाल्यास, सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2:30 वाजता होणार आहे. (Photo : ICC Twitter)

7 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स टेलिव्हिजनवर होणार आहे. डिस्ने प्लस हॉट स्टार मोबाईल ऍप्लिकेशनवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. डीडी टेलिव्हिजनवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. (Photo : ICC Twitter)