WTC 2023 Final : स्टीव्ह स्मिथची टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळी, हा विक्रम केला नावावर प्रस्थापित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथने शतक ठोकलं आणि एक विक्रम प्रस्थापित केला.
1 / 7
स्टीव्ह स्मिथने लंडनमधील ओव्हल येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले.
2 / 7
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने आपल्या उत्कृष्ट बचावात्मक खेळाने लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या स्मिथने 227 चेंडूत 95 धावा केल्या होत्या आणि नाबाद राहिला होता.
3 / 7
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारणाऱ्या स्टीव्ह स्मिथने आणखी एक धाव घेतली आणि 229 चेंडूत शानदार शतक पूर्ण केले. यासह तो टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.
4 / 7
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने टीम इंडियाविरुद्ध एकूण 8 कसोटी शतके झळकावली होती.
5 / 7
आता त्याच्या 9व्या शतकासह तो भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. तसेच इंग्लंडच्या जो रूटने टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
6 / 7
जो रूटने भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 9 शतके झळकावली आहेत. स्मिथने ओव्हलवर टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळी करत जो रूटच्या 9 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
7 / 7
या सामन्यात स्मिथच्या आधी ट्रॅव्हिस हेडने शतक ठोकले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हेडने गोलंदाजांचं डोके फिरवलं. त्याने अवघ्या 106 चेंडूत शतक झळकावले.