WTC 2023 : टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम जिंकल्यास नावावर होणार असा विक्रम
WTC 2023 Final : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. त्यानंतर गेली दहा वर्षे टीम इंडियाकडे चषकाचा दुष्काळ आहे. एकही ट्रॉफी त्यानंतर जिंकता आली नाही.
1 / 6
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताचा सामना 7 जूनपासून ओव्हलवर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाशी होत आहे. जर टीम इंडिया हा कसोटी विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला, तर क्रिकेटच्या इतिहासात अन्य कोणताही संघ करू शकणारा दुर्मिळ विक्रम रचला जाणार आहे.
2 / 6
2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपून जाईल. धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली होती. मात्र त्यानंतर आयसीसी ट्रॉफी भारतात आणण्यात टीम इंडियाला अपयश आलं.
3 / 6
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्यास वनडे, टी20 आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनेल. ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास त्यांना ही संधी मिळेल.
4 / 6
टीम इंडियाने 1984 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. नंतर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर 28 वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये पुन्हा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
5 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट. राखीव: सूर्यकुमार यादव, यशवी जैस्वाल आणि मुकेश कुमार
6 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श , टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.