WTC Final 2023 : दोन वर्षे 18 सामने..! असा होता टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप अंतिम फेरीचा प्रवास
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारताने दोन वर्षात 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत.
1 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
2 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.
3 / 9
भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
4 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
5 / 9
डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.
6 / 9
टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.
7 / 9
भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.
8 / 9
भारताने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.
9 / 9
भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.