टीम इंडियाच्या विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विराटने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 44 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान अनोखा विक्रम केलाय. विराट दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. या 5 हजार धावांमध्ये टी 20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील धावांचा समावेश आहे.
विराट सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा आणि पहिला सक्रीय भारतीय ठरला आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 6 हजार 707 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
तसेच विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरला आहे.