WTC Final 2023 : अखेर ओव्हल मैदानावरच शुभमन गिलला लग्नाचा प्रस्ताव, फोटो आले समोर
शुभमन गिल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत फेल ठरला. असं असताना दुसरीकडे, एका तरुणीने शुभमन गिलला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे.
1 / 7
युवा फलंदाज आणि टीम इंडियाचा भावी कर्णधार बनलेला शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये शतकांनंतर ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या गिलला आता ओव्हलमध्ये लग्नाचा प्रस्ताव आला आहे.
2 / 7
टीम इंडिया ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. आधीच ३ दिवसांचा खेळ संपला आहे आणि चौथ्या दिवसाचे पहिले सत्रही संपले आहे. मात्र याचदरम्यान ओव्हल मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीने टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
3 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी हा प्रस्ताव दिला. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4 / 7
शुभमन गिलच्या सध्या दोन जणांसोबत जोडलं जात आहे. मात्र यात सध्यातरी कोणतंच तथ्य नाही. पहिली बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान, दुसरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी. या चर्चा सध्यातरी सोशल मीडियावरच आहेत.
5 / 7
गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान डेट करत असल्याच्या बातम्या नुकत्याच पसरू लागल्या आहेत. दोघेही एका हॉटेलमध्ये भेटले होते. सध्या या दोघांचे नाते संपुष्टात आल्याचे वृत्त आहे.
6 / 7
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिचेही नाव गिलसोबत जोडले जात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघेही एकाच हॉटेलमध्ये होते अशी बातमी पसरली होती. याचा पुरावा म्हणून दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकाच हॉटेलमधील एक फोटो शेअर केला होते. मात्र यातही काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.
7 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणाऱ्या गिलने पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 14 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही 18 धावा करून बाद झाला. त्यामुळे गिलवर टीकेची झोड उठली आहे.