भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.
सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.
बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)