चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी यशस्वी जयस्वालचं मोठं नुकसान, ट्रेव्हिस हेडने मारली बाजी

| Updated on: Dec 25, 2024 | 5:10 PM

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेडने बाजी मारली आहे. तर जो रूटने पहिलं स्थान कायम ठेवलं असून यशस्वी जयस्वालला फटका बसला आहे.

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 जाहीर केली आहे. दुसरीकडे, टीम इंडियात या कसोटीसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे. चौथा कसोटी सामना दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

2 / 5
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात क्रमवारीत टॉप 3 फलंदाजांच्या क्रमात काही बदल झाला नाही. पण त्यानंतरच्या क्रमवारीत मात्र मोठी उलथापालथ झाली आहे. जो रूट पहिल्या स्थानावर आहे. हॅरी ब्रूक दुसऱ्या, तर केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे.

3 / 5
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला फायदा झाला आहे. तर यशस्वी जयस्वालचं नुकसान झालं आहे. तर टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत टॉप 10 मधून आऊट झाला आहे.

4 / 5
ट्रेव्हिस हेड आयसीसी कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानवार पोहोचला आहे. पाचव्या स्थानावरून त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर यशस्वी जयस्वालचं नुकसान झालं असून पाचव्या स्थानी घसरला आहे.

5 / 5
श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस सहाव्या, दक्षिण अफ्रिकेचा टेम्बा बावुमा सातव्या, न्यूझीलंडचा डेरिल मिचेल आठव्या, पाकिस्तानचा साउद शकील नवव्या आणि स्टीव्ह स्मिथ दहाव्या स्थानावर आहे.