यशस्वी जयस्वालचा अर्धशतकासह मोठा कारनामा, थेट कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड ब्रेक
Yashavsi Jaiswal india vs england 4th Test | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध 117 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. यशस्वीने या दरम्यान विराट कोहलीसह टीम इंडियाच्या माजी दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
1 / 7
यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.
2 / 7
यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. यशस्वीने 89 बॉलच्या मदतीने 1 सिक्स आणि 5 चौकारांसह हे अर्धशतक पू्र्ण केलं.
3 / 7
यशस्वीने या अर्धशतकानंतर मोठा कारनामा केला. यशस्वीने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
4 / 7
यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या सुरु कसोटी मालिकेत 600 धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने विराट कोहलीचा इंग्लंड विरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला.
5 / 7
विराटने 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 10 डावांमध्ये 593 धावा केल्या होत्या. विराटने या धावा 59.3 च्या सरासरीने केल्या होत्या.
6 / 7
यशस्वीने आता अवघ्या 7 डावांमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने 600 पेक्षा अधिक धावा करत विराटला मागे टाकलं आहे.
7 / 7
यशस्वीने विराटसह दिग्गज विजय मांजरेकर यांनाही मागे टाकलं. विजय मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात 1961-62 साली 8 डावांमध्ये 83.7 च्या सरासरीने 586 धावा केल्या होत्या.