टी20,कसोटीनंतर यशस्वी जयस्वाल वनडेत पदार्पण करण्याचा तयारीत; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मिळणार संधी
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने चमकदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 10 डावात 1 शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली. तसेच 391 धावा केल्या. त्यामुळे त्याची निवड इंग्लंडविरुद्धच्या टी20, वनडे मालिकेत होणार हे जवळपास निश्चित आहे. इतकंच काय तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतही संधी मिळू शकते.