टीम इंडियाचा पराभव तरीही यशस्वी जयस्वालच्या नावावर मोठा विक्रम, जाणून घ्या
चौथ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह मेलबर्नच्या मैदानावर एका विक्रमाची नोंद केली आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
1 / 5
चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारून पराभव झाला. 155 धावांवर टीम इंडिया तंबूत परतली. पण या 155 धावांमध्ये 82 धावा या एकट्या यशस्वी जयस्वालच्या होत्या. त्याने 207 चेंडूंचा सामना करत 84 धावा केल्या.
2 / 5
पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 118 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 82 धावा केल्या. पण दुर्दैवाने धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर मेलबर्न कसोटीत त्याने 82 धावांची खेळी केली. त्यामुळे दोन्ही डावात 50+ धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
3 / 5
सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये आणि विराट कोहलीने 2014 मध्ये एकाच मैदनात झालेल्या कसोटीच्या दोन्ही डावात 50+ धावा केल्या होत्या. आता 10 वर्षांनी यशस्वी जयस्वालने ही कामगिरी केली आहे.
4 / 5
यशस्वी जयस्वाल कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 15 कसोटी सामन्यात 29 डाव खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने 1478 धावा केल्या आहेत. 2024 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे.
5 / 5
या यादीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर आहे. त्याने या वर्षात 17 कसोटी सामने खेळले आणि 31 डावात 1556 धावा केल्या आहेत. 2024 या वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.