IND vs ENG 2nd Test | टीम इंडियाच्या विजयाचे 3 शिलेदार ज्यांनी काढली इंग्लंडची वरात
India vs England 2nd Test | टीम इंडियाच्या तिघांनी इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. हे तिघे कोण आहेत, त्यांनी काय काय केलं, हे जाणून घेऊयात.
1 / 5
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी पहिल्या पराभवाचा वचपा घेतला. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या विजयात चौघांनी निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले हे चौघे कोण आहेत, तसेच त्यांनी केलेली कामगिरी जाणून घेऊयात.
2 / 5
यशस्वी जयस्वाल याने टीम इंडियाच्या पहिल्या डावात द्विशतक ठोकलं. यशस्वीच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 396 धावांपर्यंत मजल मारली.
3 / 5
जसप्रीत बुमराह याने त्यानंतर 5 विकेट्स घेत एकूण 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहच्या या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला 253 वर गुंडाळत पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली.
4 / 5
दुसऱ्या डावात टीम इंडिया अडचणीत सापडली होती. तेव्हा शुबमन गिल टीम इंडियसाठी तारणहार ठरला. गिलने 104 धावांची खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने ऑलआऊट 255 धावा करत इंग्लंडसमोर की 399 धावांचं आव्हान देता आलं.
5 / 5
त्यानंतर बुमराहने दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली. अशाप्रकारे बुमराहने सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.