यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 98 धावांची नाबाद खेळी केली. यासह यशस्वी याने 3 विक्रम केले.
यशस्वी आयपीएल इतिहासात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. त्याने केएला राहुल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वीने 13 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. तर केएल याने 14 बॉलमध्ये ही कामगिरी केली होती.
राजस्थान रॉयल्स टीमच्या यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 मे रोजी 98 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला जिंकवलं. यशस्वीने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 575 धावा केल्या आहेत.