Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वालसाठी आणखी एक गूड न्यूज, आयसीसीकडून मोठं गिफ्ट
Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सलग द्विशतकी खेळी करत टीम इंडियाला विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर आता आयसीसीने यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे.
1 / 7
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध कसोटी कारकीर्दीतील सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वीच्या नावावर यासह मोठा रेकॉर्ड झाला आहे.
2 / 7
यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या नावावर 861 धावांची नोंद आहे.
3 / 7
यशस्वीने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याला मागे टाकलं. यशस्वीने यासह अव्वल स्थान पटकावलं.
4 / 7
यशस्वी जयस्वाल याच्यामुळे उस्मान ख्वाज याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. उस्मानच्या नावावर 855 धावांची नोंद आहे.
5 / 7
इंग्लंडचा झॅक क्रॉली तिसऱ्या स्थानी आहे. झॅकच्या नावावर 706 धावा आहेत.
6 / 7
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. स्टीव्हनच्या नावावर 687 धावा आहेत.
7 / 7
तर ऑस्ट्रेलियाच मिचेल मार्श हा पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेलने आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत 630 धावा केल्या आहेत.