ICC Test Rankings | यशस्वी जयस्वालचा धमाका, विराट कोहलीला मोठा फटका
Icc Test Ranking | आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली. या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारलीय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीचा खेळाडूंना जबरदस्त फायदा झाला आहे.
1 / 6
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाच्या खेळाडूंच्या खेळाडूंनी धमाका केला आहे.
2 / 6
टीम इंडियाचा युवा सलामीवीर मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने विराट कोहली याला मागे टाकलं आहे. यशस्वीने टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये विराट कोहली याला पछाडत 10 व्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.
3 / 6
विराटला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळल्याने मोठा फटका बसला आहे. विराटला एका स्थानाचा फटका बसलाय. विराटची आठव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
4 / 6
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील 9 डावांमध्ये 2 द्विशतकांच्या मदतीने 712 धावांची खेळी केली. यशस्वीने 89 सरासरीने या धावा केल्या.
5 / 6
यशस्वीने इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी महिन्या केलेल्या कामगिरीसाठी त्याचा आयसीसीने सन्मान केला. यशस्वीने केन विलियमसन याला मागे टाकत फेब्रुवारी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला.
6 / 6
तर आर अश्विन जगात भारी ठरलाय. अश्विनने जसप्रीत बुमराह याला मागे टाकून आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलंय.