IND vs WI: दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियातून कोणाचा पत्ता कापला जाणार? कोणाला मिळणार संधी? वाचा
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अवघ्या चार धावांनी टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात.
1 / 8
टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 150 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताला 145 धावाच करता आल्या. अवघ्या चार धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
2 / 8
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना 6 ऑगस्ट रविवारी प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या फलंदाजांना आराम दिला जाण्याची दाट शक्यता आहे.
3 / 8
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना असेल.
4 / 8
दोन कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीत 171 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 57 आणि दुसऱ्या डावात 38 धावा केल्या होत्या.
5 / 8
यशस्वी जयस्वालने क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म दाखवला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे तो प्रकाशझोतात आला होता.
6 / 8
आयपीएलमध्ये जयस्वालने एकहाती सामना जिंकून देण्यास मदत केली आहे. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात यशस्वी जयस्वाल याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
7 / 8
दुसरीकडे, वेस्ट इंडिजमध्ये शुभमन गिल याला काही सूर गवसताना दिसत नाही. त्यामुळे त्याला ओपनिंगवरूनन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाचारण केलं जाऊ शकतं. इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येऊ शकतात.
8 / 8
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मुकेश कुमार.