युवराज सिंह रोहित शर्मा-विराट कोहलीच्या कमबॅकवर काय म्हणाला?

| Updated on: Jan 15, 2024 | 3:18 PM

Virat Kohli And Rohit Sharma | रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टी 20 टीम इंडियात कमबॅक झालं. तेव्हापासून क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया येत आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर रोहित-विराटच्या एन्ट्रीचं क्रिकेट चाहते कौतुक करतायेत. तर काहींकडून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे.

1 / 5
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेतून 14 महिन्यांनी टीम इंडियात पुन्हा एन्ट्री झाली आहे. या दोघांना इतक्या महिन्यांच्या विश्रांतीनंतर दिल्याने निवड समितीवर टीका करण्यात आली. आता यावर टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
रोहित आणि विराट या दोघांनी अखेरचा टी 20 सामना हा 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलचा सामना होता. त्यानंतर दोघे थेट अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिकेतून परतले आहेत.

3 / 5
युवराजला विराट आणि रोहितच्या कमबॅकबाबत विचारण्यात आलं.  युवराजने यावर "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना" अशी प्रतिक्रिया दिली.

4 / 5
हे दोन्ही खेळाडू टी 20, वनडे आणि टेस्ट अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतात. त्यामुळे त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावं लागतं. निवड समितीसाठी हा एक मोठा प्रश्न आहे, असंही युवराजने म्हटलं.

5 / 5
युवराजने सोबतच रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक केलं तसेच तो अप्रतिम कर्णधार असल्याचं म्हटलं.  रोहितने 5 वेळा आयपीएल जिंकलंय. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलचं तिकीट मिळवलं होतं, असंही युवराजने नमूद केलं. (All Pc- AFP)