IND vs WI T20: दोन विकेट घेऊनही युजवेंद्र चहल याच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते वाचा
टी20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याच्या फिरकीपुढे दिग्गज खेळाडूंना शरणागती पत्कारावी लागली आहे. पण त्याच्या नावावरही नकोसा विक्रम प्रस्थापित झाल आहे. सर्वाधिक षटकार ठोकलेल्या गोलंदाजाच्या यादीत स्थान मिळालं आहे.
1 / 9
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव सहन करावा लागला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताला 9 गडी गमवून 145 धावांवर समाधान मानवं लागलं.
2 / 9
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहल याने चांगली कामगिरी केली. एकाच षटकात दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले.
3 / 9
दोन गडी बाद करूनही युजवेंद्र चहलच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. टी20 मध्ये युजवेंद्र चहल याने एकूण 1674 चेंडू टाकले आहेत. यापैकी काही चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचं नकोशा यादीत समावेश झाला आहे.
4 / 9
आतापर्यंत युजवेंद्र चहल याला 119 षटकार मारण्यात आले आहेत. या यादीत इंग्लंडचा आदिल रशीदसह संयुक्त स्थानावर आहे. या यादीत कोणकोणते खेळाडू आहेत ते जाणून घेऊयात
5 / 9
सर्वाधिक षटकार ठोकलेल्या गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा ईश सोढी पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2035 चेंडू टाकले असून त्याला 129 षटकार मारले आहेत.
6 / 9
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात दोन षटकार पडल्यानंतर युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत टाकलेल्या 1674 चेंडूत एकूण 119 षटकार आले आहेत.
7 / 9
इंग्लंडचा आदिल रशीद हा चहलसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 1988 चेंडू टाकले असून त्यालाही 119 षटकार पडले आहेत.
8 / 9
न्यूझीलंडचा टिम सौदी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 2335 चेंडू टाकले असून 117 षटकार पडले आहेत.
9 / 9
बांगलादेशचा फिरकीपटून शाकिब अल हसन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 2535 चेंडू टाकले असून 108 षटकार पडले आहेत.