Marathi News Photo gallery Sri Lanka : Ranil Wickremesinghe is the new President of Sri Lanka; The election was won by 134 votes, the fury of the protesters continued
Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती; 134 मतांनी जिंकली निवडणूक, आंदोलकांचा रोष कायम
देशातील जनता आधीच विक्रमसिंघे यांना विरोध करत होती. अनेक आंदोलक त्यांची आणि गोटाबाया दोघांची हकालपट्टी करण्याची मागणी करत होते.आता या विजयामुळे देशात आणखी निदर्शने सुरू होऊ शकतात
1 / 10
राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षाचा निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुआज झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याशिवाय देशातील नागरिक विक्रमसिंघे यांच्या नावाला विरोध करत होते.
2 / 10
सहा वेळा पंतप्रधान राहिलेले विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाल्याचे अधिकृत आकडेवारी दर्शवते. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित केले. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, देश अत्यंत कठीण परिस्थितीत आहे, आपल्यासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.
3 / 10
देशातील जनता आधीच विक्रमसिंघे यांना विरोध करत होती. अनेक आंदोलक त्यांची आणि गोटाबाया दोघांची हकालपट्टी करण्याची मागणी करत होते.आता या विजयामुळे देशात आणखी निदर्शने सुरू होऊ शकतात, असे बोलले जात आहे.
4 / 10
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आल्हापेरुमा यांना आंदोलकांची पसंती होती, परंतु त्यांना राज्यकारभाराचा उच्च पातळीवरचा फारसा अनुभव नव्हता.
5 / 10
223 सदस्यांच्या संसदेत दोन खासदार गैरहजर होते आणि एकूण 219 मते वैध घोषित करण्यात आली. त्यात 4 मते अवैध ठरविण्यात आली.
6 / 10
विक्रमसिंघे यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असून आता ते देशाचे राष्ट्रपती झाले आहेत.
7 / 10
बेलआउट पॅकेजसाठी आयएमएफशी चर्चा सुरू आहे. श्रीलंकेत 22 दशलक्ष लोकांना अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. नवीन अध्यक्ष माजी राष्ट्रपती राजपक्षे यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत काम करतील.
8 / 10
रनिल विक्रमसिंघे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्या युनायटेड नॅशनल पक्षाचा संसदेत एकच खासदार आहे.
9 / 10
रनिल विक्रमसिंघे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्या युनायटेड नॅशनल पक्षाचा संसदेत एकच खासदार आहे.
10 / 10
अध्यक्षपदाच्या शर्यतीत, विक्रमसिंघे यांचा सामना दुल्लास अलाहपेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिले मत स्पीकरने तर दुसरे मत रानिल विक्रमसिंघे यांनी दिले.