टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटेटर संजना गणेशन 14 किंवा 15 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र याबाबत अजूनही हे दोघे लग्नाबाबत काही बोलले नाहीयेत.
बुमराहची होणारी पत्नी गेल्या काही वर्षांपासून स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत आहे. ती वयाने बुमराहपेक्षा मोठी आहे. संजनाचा जन्म 9 जून 1991 रोजी झाला होता. तर बुमराह 6 डिसेंबर 1993 मध्ये जन्मला होता. म्हणजेच दोघांमध्ये अडीच वर्षांचं अंतर आहे.
टीम इंडियाचे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, शिखर धवन यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्नगाठ बांधली आहे.
संजना स्पिलिट्सविलाच्या सातव्या मोसमात मॉडेल आणि अभिनेता अश्विनी कौलसोबत होती. यादरम्यान संजनाला दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनी या कार्यक्रमातून माघार घेतली होती.अश्विनीने संजनासाठी हा कार्यक्रम मध्येच सोडून दिला. त्यानंतर हे दोघे एकत्र दिसले नाहीत.