State Bank of India : स्टेट बँकेचा 44 कोटी ग्राहकांना अलर्ट, दोन क्रमाकांपासून सावधानतेचं आवाहन; अन्यथा अकाउंट झिरो!
बँकेने ग्राहकांना विविध संवादाची माध्यमे मेसेज, ईमेल आणि फिशिंग माध्यमातून येणाऱ्या मेसेजबाबत सूचित केले. स्टेट बँकेने ट्विटद्वारे ही माहिती जारी केली आहे.
1 / 5
देशातील सरकारी क्षेत्रातील अग्रणी बँक स्टेट बँकने आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. स्टेट बँकेने ग्राहकांना दोन मोबाईल क्रमांकापासून सावधान राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. बँकेने ग्राहकांना विविध संवादाची माध्यमे मेसेज, ईमेल आणि फिशिंग माध्यमातून येणाऱ्या मेसेजबाबत सूचित केले. स्टेट बँकेने ट्विटद्वारे ही माहिती जारी केली आहे. तसेच संभाव्य फसवणुकींच्या घटनांपासून दूर राहण्याचे देखील आवाहन केले आहे. अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास तत्काळ नजीकच्या बँक शाखेत तक्रार नोंदविण्याचं किंवा हेल्पलाईन नंबर 1930 वर संपर्क साधण्यास सूचित केलं आहे.
2 / 5
पुण्यात फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनूज गोयल व अंकित गोयलवर गुन्हा दाखल
3 / 5
स्टेट बँकेने ग्राहकांची सुरक्षा प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे. धोक्यांपासून दूर राहण्यासाठी बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. टेलि कॉलर, ईमेल आणि एसएमएस माध्यमातून प्राप्त होणाऱ्या संदिग्ध प्रस्तांवासापून सावध राहावे. तुमचा पासवर्ड नेहमी गुप्त ठेवा आणि विहित वेळेच्या कालमर्यादेत त्यामध्ये बदल करा. स्टेट बँकेशी संपर्क करण्यासाठी केवळ बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच संपर्क साधावा. सायबर तक्रार https://cybercrime.gov.in वर नोंदव्यात
4 / 5
स्टेट बँकेने ग्राहकांना वैयक्तिक खात्याची माहिती सार्वजनिक न करण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्राहकांनी नेहमी सहज उपलब्ध न होऊ शकणारा पासवर्ड बनविण्याचं आवाहन केलं आहे. तुमचे एटीएम कार्ड नंबर, पिन, यूपीआय पिन सारखे तपशील सार्वजनिक स्वरुपात लिहू नका. सामाजिक माध्यमांवर अशाप्रकारची माहिती सार्वजनिक करण्याचं टाळावे जेणेकरुन माहितीचा दुरुपयोग टाळता येईल.
5 / 5
रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना फसवणुकींपासून संरक्षित करण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. बँकेच्या वतीने ग्राहकांच्या माहितीसाठी माहितीपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. बनावट लिंक निर्माण करुन ग्राहकांची वैयक्तिक माहिती प्राप्त करुन आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे.