PHOTO | महात्मा फुलेंचा स्मृतीदिन; राज्यात विविध नेत्यांकडून अभिवादन
थोर समाजसुधार महात्मा फुले यांची शनिवारी (28 नोव्हेंबर) 130 वी पुन्यतिथी. यानिमित्त राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.
-
-
थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शनिवारी (28 नोव्हेंबर) 130 वी पुन्यतिथी. यानिमित्त राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.
-
-
महात्मा फुले यांच्या 130 व्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथे महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.
-
-
महात्मा फुले यांच्या 130 व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सम्नानित करण्यात आले. त्यांनीही महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
-
-
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचीही उपस्थिती होती. त्यांनीदेखील महात्मा फुलेंच्या स्मृतींना अभिवादन केले.
-
-
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील फुलेवाडा येथे जाऊन महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले.
-
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईतील भाजप कार्यालयात महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.
-
-
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीदेखील मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली.
-
-
पाहा आणखी काही फोटो…
-
-
पाहा आणखी काही फोटो…