Marathi News Photo gallery Stocks to Buy in the next 15 days, Be Malamal; What are these 5 Multibagger stocks axis direct check targets
Multibagger Stock : 15 दिवसांत होईल धनवर्षा; हे 5 स्टॉक लावतील लॉटरी
Stocks to BUY : निफ्टी 24400 च्या पुढे गेला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत बाजाराने मोठी झेप घेतली आहे. बाजाराचे सेंटिमेंट मजबूत आहेत. त्याआधारे ॲक्सिस डायरेक्टने पुढील 15 दिवसांच्या आधारे 5 शेअरची निवड केली आहे. कसा होईल तुमचा फायदा?
1 / 6
4 जुलै,2024 रोजी शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही इंडेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. रॉकेटच्या गतीने भरपाई झाली. सेन्सेक्स 80,000 चा आकडा पार केला. महिन्याभरात सेन्सेक्सने जवळपास 10,000 अंकांची रिकव्हरी करत इतिहास रचला.
2 / 6
Bajaj Electrical चा शेअर 1100 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. 1079-1089 रुपयांच्या स्तरावर खरेदीचा सल्ला दिला आहे. 1158 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 1066 रुपये स्टॉपलॉस आहे. या स्टॉकचा 52 Wk High 1148 रुपये आहे.
3 / 6
CDSL चा शेअर 2326 रुपयांच्या स्तरावर आहे. 2330-2358 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. 2524 रुपयांचे टार्गेट आणि 2315 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला. या स्टॉकमध्ये 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 2538 रुपयांची आहे.
4 / 6
Mahindra & Mahindra चा शेअर 2895 रुपयांच्या स्तरावर आहे. 2880-2909 रुपयांची रेंजमध्ये खरीदेचा सल्ला दिला आहे. 3240 रुपयांचे टार्गेट आहे. 2865 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला. या स्टॉकचा 52 Wk High 3013 रुपये आहे.
5 / 6
Ponni Sugar शेअरचा 534 रुपयांच्या स्तरावर आहे. 605 रुपयांचे टार्गेट आणि 500 रुपयांचे स्टॉपलॉस दिला आहे. इंट्राडेमध्ये या स्टॉकने 542 रुपयांचा नवीन 52 Wk High सर्वकालीन उच्चांक 581 रुपये आहे.
6 / 6
Piramal Enterprises चा शेअर 945 स्तरावर आहे. 1085 रुपयांचे टार्गेट आणि 900 रुपयांचे स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉक 52 Wk High 1140 रुपयांचा आहे. (सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.)