कॉमेडियन सुगंधा मिश्रा नुकतंच लग्न बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, 9 मे रोजी सुगंधानं पती संकेत भोसलेचा वाढदिवस साजरा केला.
सुगंधाने तिच्या पतीसाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली. एवढंच काय कर रोमँटिंक फोटोसुद्धा शेअर केले. सुगंधा आणि संकेत यांची जोडी मेड फॉर इच अदर असल्याचं तिनं लिहिलं.
सुगंधानं फोटो शेअर करत लिहिलं- वाढदिवसाच्या शुभेच्छा... मी तुला भेटेपर्यंत सोलमेट म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. जो तू आहेस आणि माझ्यासाठी तू जे काही करतोस त्यासाठी धन्यवाद. तू माझा मित्र, भागीदार आणि सुखकारक आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा हबी.
26 मे रोजी सुगंधा मिश्राचं संकेत भोंसलेशी लग्न झालं. जालंधर येथील क्लब कॅबाना रिसॉर्टमध्ये हे लग्न झालं. या लग्नात उपस्थित सर्व मान्यवरांना 24 तास विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.
सुगंधाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2008 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून तिनं आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. या शोमधून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. सुगंधा ही एक उत्तम कॉमेडियन मानली जाते.
सुगंधानं कपिल शर्माबरोबर त्याच्या शोमध्येही काम केलं आहे. विनोदीबरोबरच तिला गाणं गायलाही खूप आवडतं.